
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२४ । जळगाव जिल्हा हा नेहमीच त्याच्या वाढत्या तापमानाने चर्चेत असतो. यावर्षी देखील मान्सून येण्यापूर्वी खानदेश मध्ये उन्हाचे चांगले चटके बसत होते जळगाव मध्ये उन्हाच्या तळ्यात मुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश देखील दिले होते. परंतु यंदाच्या उन्हाळ्यामुळे चिंताजनक बातमी समोर आली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने ४७ अंश पार केले होते, सर्वाधिक उन्हाचा तडाखा हा मे महिन्यात बसला. परंतु या तापमानाचा परिणाम हा भूगर्भातील पाणी पातळीवर झाला. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी पातळीत दीड ते दोन मीटरने घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने हा अहवाल दिला आहे.
ही पाणी पातळीत झालेली घट भरून काढण्यासाठी यावर काही उपाययोजना देखील भूजल सर्वेक्षण विभागाने सांगितले आहे त्या म्हणजे पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, झाडे लावणे, सर्वांनीच पाण्याची बचत करणे, अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे असे भूजल सर्वेक्षण विभागाने सांगितले आहे. मागील महिन्यात जळगाव जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक होतो या उन्हाने नागरिक देखील अतिशय त्रस्त झाले होते उद्योगधंद्यांवर देखील या तापमानाचे सावट होते बाजारपेठेत दिवसा शांतता आणि रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी असे चित्र होते. तर दुसरीकडे पाण्याची टंचाई असलेल्या भागात पाण्याची टँकर शहराच्या ठिकाणी पाणी बॉटल्स चार यांची मागणी देखील वाढली होती.
संपूर्ण जिल्ह्यात एकूण ९४ गावात पाणीटंचाई जाणवली, या गावांमध्ये ११३ टँकर सुरू करून नागरिकांची तहान भागवण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केले टंचाईचे निवारण करण्यासाठी १६६ गावात १८६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. आत्ता पावसाची सुरुवात झाली असून हवा तसा पाऊस अजून पडलेला नाही यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईची गावे वाढण्याची शक्यता आहे.
या पाणी पातळीच्या घटित जळगाव जिल्ह्यातील यावल, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव, या तालुक्यात सर्वाधिक पाणी पातळीत घट झाली आहे.
या भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार पाणी पातळीत घट झालेल्या तालुक्यातील आकडेवारी अशी ;
तालुका — किती मीटरने घट
भडगाव– १.४२
पाचोरा– ०.७४
पारोळा– ०.५८
एरंडोल– ०.९८
चोपडा– ०.६१
जळगाव– ०.७३
जामनेर– ०.९५
बोदवड– १.९०
भुसावळ– ०.०७
यावल– २.१७
रावेर– ०.५९
धरणगाव– १.९७
मुक्ताईनगर– ०.५१
अमळनेर– १.९४
चाळीसगाव– २.१५