⁠ 
रविवार, ऑक्टोबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; जळगावात कशी आहे पावसाची स्थिती?

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; जळगावात कशी आहे पावसाची स्थिती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२४ । राज्यात मान्सून पूर्णत: सक्रिय झाला असून सध्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळत. दरम्यान, राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

कुठे ऑरेंज अलर्ट?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज कोकणातील बहुतेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे

जळगाव कशी आहे पावसाची स्थिती?
जिल्ह्यात सध्या ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे. आज बुधवारी जळगाव शहरात जिल्ह्यातील काही भागात तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशीच स्थिती १ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात बदल होऊ शकतो.

दरम्यान, आतापर्यंत ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकरी पेरणी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. मात्र दुसरीकडे काही भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहेत. चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. जमिनीत ६ इंच ओल गेल्यानंतरच बियाण्यांची लागवड करावी असंही कृषी खात्याने म्हटलं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.