⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

थोरपाणी पाड्यातील मृतांच्या नातेवाईकांचे डॉ.केतकी ताई पाटील यांच्याद्वारे सांत्वन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२४ । यावल तालुक्यातील थोरपाणी या ठिकाणी आदिवासी पाड्यावर मागील आठवड्यात झालेल्या वादळात एका पावरा कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर गोदावरी फाउंडेशन संचालिका ,तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जळगाव जिल्हा पूर्व पश्चिम ,आणि जळगाव महानगर महिला मोर्चा डॉ. केतकीताई पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आणि एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करून माणुसकी जोपासले.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत लागून असलेल्या अतिदुर्गम भागातील थोर पाणी या आदिवासी पाड्यावर घर कोसळून एकाच आदिवासी पावरा कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दुर्दैवी घटनेत पावरा कुटुंबातील नानसिंग गुलाब पावरा, सोनुबाई नानसिंग पावरा, रतिलाल नानसिंग पावरा आणि बालीबाई नानसिंग पावरा या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या कुटुंबातील एक मुलगा शांतीलाल मानसिंग पावरा हा सुदैवाने बचावला. या घटनेमुळे दुःखाचा डोंगर पावरा कुटुंबीयांवर व नातेवाईकांवर कोसळला होता, त्यांचे सांत्वन डॉ. केतकीताई पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभासद भरत भाऊ महाजन, भाजपा कार्यकर्ते राहुल पाटील ,स्थानिक कार्यकर्ते सुरेश हट्टा पावरा, हट्टा रजन पावरा, बाला गुला पावरा, चिमा नांदला पावरा यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नागरिकांशी चर्चा करून पाण्यातील प्रत्येकाला आरोग्य शिबिराद्वारे आरोग्य सेवा पोहोचविण्याचा मानस डॉ. केतकी ताईंनी बोलून दाखवला.

श्वानामुळे बचावला बालक मायेचा फिरविला हात टेकडीवरून जीव मुठीत घेऊन कुटुंबीय धावत असताना, शांतीलाल हा बालक देखील धावत होता. अचानक काळाचा घाला आपल्या आई, वडील, बहिण, भावंडांवर झाल्याने त्याला उमजेना झाले. अखेरीस निष्ठावान श्वानाने बालकाला आपल्या मागे धावायला लावून, मृत्यूच्या दाढीतून बाहेर ओढले. त्याबद्दल आज डॉ. केतकीताई पाटील यांनी भेट देऊन बालकाच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला आणि धीर दिला.