अंजनी नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सप्टेंबर 7, 2021 7:51 PM

 

hatnur dam jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ सप्टेंबर २०२१ | अंजनी मध्यम प्रकल्प, एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव या धरणाची सध्याची पाणी पातळी 52 % असून धरण फक्त 4 ते 5 फूट खाली आहे.

सायंकाळी अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झालेला असल्याने धरणात 52 % टक्के पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात सतत वाढ होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने धरणाच्या सुरक्षितेच्यादृष्टीने धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येईल.

 

तरी अंजनी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून अंजनी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. जीवित वा वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व पाटबंधारे उप विभाग एरंडोल यांचेतर्फे करण्यात आले आहे.

 

00000

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now