पोल उभारणीचे काम जूनअखेर पूर्ण होणार ?

एप्रिल 27, 2022 12:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ एप्रिल २०२२ । शहरातील महामार्गावर विद्युत राेषणाईच्या कामासाठी प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. तब्बल ३५० पाेल उभारणीसाठी पुणे येथील मक्तेदाराकडून दाेन पाेलमधील अंतर माेजणी व रेखांकनाचे काम हाती घेण्यात आल्याने आता काम पूर्ण होईल असे सांगितले जात आहे.

पोल

सदर पोल उभारणीचे काम जूनअखेर पूर्ण हाेईल, असा दावा केला जाताे आहे. महामार्गावर कालिंकामाता मंदिरापासून खाेटेनगरपर्यंत सुमारे ८ किलाेमीटर अंतरावर महामार्गाच्या मध्यभागी व अंडरपासच्या दाेन्ही बाजूने विद्युत पाेल उभारून पथदिवे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी २० मीटर, १२ मीटर व ९ मीटर उंचीचे ३५० पाेल उभारणीचे काम पुढच्या आठवड्यात केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now