⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

करदात्यांची निराशा : टॅक्स स्लॅब ‘जैसे थे’, ..तर करचुकवेगिरी करणाऱ्यांची संपत्ती जप्त होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । देशाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कराचे स्लॅब जैसे थे ठेवले आहे. करदात्यांना यामुळे पुन्हा एकदा निराशा आली आहे. कर स्लॅबमध्ये दिलासा मिळेल अशी अपेक्षा करदाते लावून होते.

सन २०२२ चा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. वाढती महागाई, बेरोजगारांची वाढलेली संख्या, घसरता रुपया, निर्गुंतवणूक, खनिज तेलाचे वाढत असलेले दर अशी अनेक आव्हानं सीतारामन यांच्यासमोर होती. महसूल वाढवायचा, पण त्याचवेळी करदात्यांना दिलासादेखील द्यायचा, असं दुहेरी आव्हान असल्याने त्यांनी कराचे स्लॅब जैसे थे ठेवले.

आता करदात्यांना आपले रिटर्न अपडेट करता येणार
आयकर भरल्यानंतर अनेकदा करदात्यांना काही चुका लक्षात येतात. आकडे चुकलेले असतात. उत्पन्नाची माहिती भरणं चुकून राहून जातं. अशा स्थितीत रिटर्न अपडेट करता येणार आहे. कॉर्पोरेट कर १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर, स्टार्ट अप्ससाठी असलेली कर सवलत एका वर्षानं वाढवली. को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांचा कर १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर. सरचार्ज १२ टक्क्यांवरून ७ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.

करचुकवेगिरी करणाऱ्यांना मोठा दणका बसणार
केंद्र कर चुकवेगिरी करणाऱ्यांसाठी नवीन योजना आखात असून त्यानुसार कर चोरी करणाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे. आयकर विभागाने छापा मारल्यास संपूर्ण संपत्ती जमा केली जाणार आहे. सलग सहाव्या वर्षी आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. कर रचना जैसे थे ठेवल्याने अनेकांची निराशा झाली आहे तर काही जणांनी समाधान व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा :