जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जुलै 26, 2026 9:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील आर.एल. चौफुली परिसरात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत अयोध्या नगर येथील रहिवासी संदीप सुपडू अलकरी (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

accident jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप अलकरी हे जळगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे काम आटोपून ते दुचाकीने अयोध्या नगर येथील घरी परतत होते. दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास आर.एल. चौफुली येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संदीप अलकरी गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघात करणारे वाहन आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजचीही पडताळणी केली जात आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मयत संदीप अलकरी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार असून, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now