अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले! भारत सरकारचा इंधनाबाबत मोठा निर्णय

जुलै 16, 2026 11:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाल्याने जागतिक पातळीवर खळबळ माजली आहे. या युद्धाच्या वाढत्या तीव्रतेमुळे मध्य-पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. या बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला असून, डिझेल आणि विमान इंधनाच्या (ATF) निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये प्रति लिटर ७ रुपयांची वाढ केली आहे. हे नवे करदर आज म्हणजेच १६ जुलैपासून लागू झाले आहेत.

petrol diesel 2

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, डिझेल निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स ८.५० रुपयांवरून १५.५० रुपये प्रति लिटर, तर एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील कर ७.५० रुपयांवरून १४.५० रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. दुसरीकडे, पेट्रोल निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स मात्र प्रति लिटर ४ रुपयांनी कमी करण्यात आला आहे.

यापूर्वी जुलैमध्ये जेव्हा अमेरिका-इराण युद्ध काही काळासाठी शांत झाले होते, तेव्हा सरकारने पेट्रोलवरील कर वाढवून डिझेल-एटीएफवरील कर कमी केला होता. मात्र, युद्ध पुन्हा भडकल्याने सरकारने १६ जुलैपासून यात पुन्हा वाढ केली आहे.

पेट्रोल-डिझेल महागणार का?

सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मात्र, नागरिकांना चिंता करण्याची गरज नाही. कारण विंडफॉल टॅक्स हा थेट ग्राहकांवर न लादता तेल कंपन्या किंवा उद्योगांवर लावला जाणारा अतिरिक्त कर आहे. देशांतर्गत बाजारात इंधनाचा पुरवठा पुरेसा राहावा आणि निर्यातदार कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय वाढत्या किमतींचा अवाजवी फायदा घेऊ नये, हा या करामागील मुख्य हेतू आहे. त्यामुळे भारतातील किरकोळ इंधन दरांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now