सहा आरपीएफ निरीक्षकांना सहायक सुरक्षा आयुक्तपदी पदोन्नती

नोव्हेंबर 6, 2022 6:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । मध्य रेल्वेतील सहा आरपीएफ निरीक्षकांना सहायक सुरक्षा आयुक्तपदी पदोन्नती नुकतीच प्राप्त झाली आहे. त्यात भुसावळातील तत्कालीन निरीक्षक गोकुळ सोनोनी, जुबेर पठाण, अजय यादव यांचाही समावेश आहे. गुरूवारी रात्री पदोन्नतीचे आदेश निघाले आहेत.

rpf jpg webp

असे आहेत पदोन्नती झालेले अधिकारी
गोकुळ सोनोनी यांची सोलापूर ते बरोनी, जुबेर पठाण मुंबई ते आसाम आयजींचे रीडर, अजय यादव यांची मुंबई ते लॉमडींग (आसाम), अजरती माने, पुणे ते गया, देवानीश लाकडा, पुणे ते न्यु.जलपैगुडी (आसाम) यांचा समावेश आहे. यातील सोनोनी, यादव, पठाण या अधिकार्‍यांनी भुसावळ रेल्वे स्थानक निरीक्षक म्हणून काम केले आहे. भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या आयुक्तांची जागा रिक्त आहे, मुंबई येथील आयुक्तांकडे येथील अतिरीक्त पदभार आहे. शहरासाठी कुणाची नियुक्ती होते? याकडे अधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now