⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

धक्कादायक : तलाठ्याला धक्काबुक्की करत वाळूने भरलेले डंपर पळवले

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । वैजनाथ शिवारातून अवैध्यरित्या वाळूची वाहतूक करत असलेल्या डंपरवर कारवाई असताना तलाठीला शिवीगाळ व ढकलून देवून डंपर घेऊन पळून जाणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील वैजनाथ शिवारात बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वैजनाथ येथील तलाठी दीपक ठोंबरे यांना मिळाली आहे. त्यानुसार त्यांनी मंगळवारी ३१ मे रोजी सकाळी ८ वाजता कारवाई केली. दरम्यान डंपर चालक यांना विचारले असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले. त्यानुसार एरंडोल तहसील कार्यालयात डंपर घेऊन चाल असे तलाठी यांनी सांगितले, परंतु डंपर मालक बंटी विकास पाटील रा. जळगाव याने तलाठी दिपक ठोंबरे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून ढकलून दिले आणि डंपर चालक याने वाळूने भरलेले डंपर एरंडोल तहसील कार्यालयात न नेता पळवून घेऊन गेला.

या संदर्भात तलाठी दीपक ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक आणि डंपर मालक बंटी विकास पाटील रा. जळगाव यांच्याविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. विजय चौधरी करत आहे.