शिवसेनाही एकत्रच बाळासाहेबांचीच – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेत गट तट नसून शिवसेना एकत्रच असल्याचे म्हटले होते. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. शिवसेना ही एकत्रच व बाळासाहेबांचीच असून महाराष्ट्रभर शिवसेना प्रमुखांची शिवसेना म्हणून काम करतोय, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील म्हटले आहे.

संजय राऊत हे फडणवीसांना भेटणार यावर बोलताना संजय राऊत यांनी कोणाला भेटावे हा त्यांचा विषय आहे. राऊत यांनी नरमाईची भूमिका घेतली आणि म्हटले होते की, राजकारणातील कटूपणा संपवायचाय; यावर बोलताना मंत्री पाटील यांनी आपण त्यांच्या स्वभावाचा विचार करू शकत नाही, शेवटी ज्याचा त्याचा विषय आहे.

संजय राऊत म्हणाले होते की, केंद्राच्या इशारा नंतर मला अटक झाली. यावर पाटील यांनी सांगितले, की राऊत यांना अटक झाली, सुटका झाली आणि ते बाहेर आलेत. त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे; असे काही वाटत नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.