Friday, December 9, 2022

वडीलांसोबतचा ‘तो’ संवाद अखेरचा ठरला! अपघातातील गंभीर जखमी‎ अ‍ॅपेचालक युवकाचा मृत्यू‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । कुऱ्हे पानाचे‎ येथून जवळच असलेल्या‎ गारखेडा-जामनेर रस्त्यावर २१ रोजी‎ ‎सकाळी‎ ‎आयशर ट्रकने‎ अ‍ॅपेरिक्षाला‎ ‎समोरून धडक‎ दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ ठार तर चार जण जखमी झाले होते. या अपघातातील जखमी रिक्षा चालक तरुणाचा देखील रविवारी उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. ‎त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या ‎चार झाली आहे.‎ सागर समाधान टोंगळे‎ (वय २२, रा.कुऱ्हा पानाचे) असे जखमी दरम्यान, जखमी अ‍ॅपेरिक्षा चालकाचे नाव आहे. दरम्यान, सागर याने माझी यात काहीही चूक नसल्याचं सांगत ट्रकचालकाने‎ समोरून माझ्या अंगावर ट्रक‎ आणली असल्याचा संवाद वडीलांसोबतचा अखेरचा‎ संवाद ठरला.‎

- Advertisement -

याबाबत असे की, २१ डिसेंबर रोजी सकाळी गारखेडा-जामनेर रस्त्यावर ट्रकने‎ अ‍ॅपेरिक्षाला‎ ‎समोरून जोरदार धडक‎ दिली. यात तीन जणांचा जागेच मृत्यू झाला तर चार गंभीर झाले होते. जखमींमध्ये अ‍ॅपेरिक्षा चालक सागरच्या चेहऱ्यावर, ‎छातीत व पायाला मार लागला होता. ‎छातीत मार लागल्यामुळे त्याला‎ श्वास घेण्यास त्रास होत होता.‎ गेल्या पाच दिवसांपासून तो‎ ऑक्सिजनवर होता. शेवटी मृत्यूशी‎ झुंज देताना रविवारी सकाळी त्याची‎ प्राणज्योत विझली. सागरच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी‎ असा परिवार आहे. याच‎ अपघातातील पूनमचंद भोई व मनीष‎ सोनवणे यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. ‎

मृत सागरने आयटीआय‎ इलेक्ट्रीशयनचे शिक्षण घेतले होते. नोकरीसाठी त्याने अनेक ठिकाणी‎ अर्ज केले होते. १ जानेवारीपासून तो‎ ‎एका कंपनीत रुजू होणार होता.‎ तत्पुर्वी वडीलांना मदत करण्यासाठी‎ तो अ‍ॅपेरिक्षा चालवत होता.‎

- Advertisement -

वडीलांसोबतचा अखेरचा‎ संवाद

‘माझी चूक नव्हती’‎ “बाबा माझी काहीच चूक नव्हती,‎ मी आपल्या साईडला बरोबर रिक्षा‎ चालवत होतो. ट्रकचालकाने‎ समोरून माझ्या अंगावर ट्रक‎ आणली. ट्रक इतकी वेगाने होती‎ की, मला रिक्षाखाली उतरायला‎ क्षणभरही संधी मिळाली नाही’, हा‎ सागरचा वडीलांसोबतचा अखेरचा‎ संवाद ठरला.‎

- Advertisement -

हे देखील वाचा :

- Advertisement -
[adinserter block="2"]