Jalgaon : चाकूचा धाक दाखवून लुटणारे चार सराईत गुन्हेगार जेरबंद

जून 12, 2026 12:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत कारवाई करत चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहे. आरोपींकडून रोख रक्कम आणि फिर्यादीच्या मालकीची दुचाकी जप्त करण्यात आली.

crd 1

पोलिसांच्या माहितीनुसार, ११ जून रोजी रात्री साडेआठ ते पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चेतन प्रकाश पाटील (रा. खोटे नगर, जळगाव) हे आपल्या साथीदारांसह पाळधी रोडने जात असताना साई गार्डन आणि हॉटेल राधिकाजवळ सार्वजनिक रस्त्यावर चार जणांनी त्यांना अडवले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करून जबरदस्तीने रोख रक्कम आणि दुचाकी हिसकावून घेत घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तातडीने तपास सुरू केला.

गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत चारही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चेतन उर्फ बट्या रमेश मुशीर, उमाकांत दत्तात्रय जाधव, गौरव संजय जाधव आणि रोशन भगवान पाटील यांचा समावेश आहे. यातील काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम आणि फिर्यादीची दुचाकी जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) नितीन गणापुर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सफा सुनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश पाटील, पोलीस हवालदार अविनाश देवरे, कैलास इंगळे, पोलीस कॉस्टेबल प्रविण कोळी, दीपक देवरे, किरण पाटील आणि वाहन चालक पाहेको पंकज देशमुख यांनी केली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now