निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्वाची बातमी ! जळगावात १९ जून रोजी जिल्हा पेन्शन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन

जून 15, 2026 5:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृह येथे जिल्हा पेंशन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), महाराष्ट्र-१, मुंबई येथील चार अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या व प्रश्नांचे निराकरण करणार आहेत. 19 जून रोजी सकाळी 10.30 यावेळेत कार्यशाळा घेण्यात आली आहे.

Pensioner jpg webp

जळगाव जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांना या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, निवृत्तीवेतन विषयक अडचणी व प्रश्न यावेळी सोडवून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

तसेच, आपल्या परिचयातील इतर निवृत्तीवेतनधारकांनाही या कार्यशाळेची माहिती देऊन या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now