विद्यार्थ्यांसमोर डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी सादर केले जलनेतीचे थेट प्रात्यक्षिक

जून 15, 2026 5:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव खुर्द येथे प्रतिश्याय (नाक वाहणे, शिंक येणे, नाक बंद होणे) या समस्येवरील चर्चेदरम्यान योगशास्त्रातील उपयुक्त शुद्धीकरण क्रिया असलेल्या जलनेतीचे प्रात्यक्षिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी करून दाखविले.

harshal borole

यावेळी सहाय्यक प्राध्यापक डॉ. कोमल पाटील आणि योग प्रशिक्षक चैतन्य शिरसागर यांनी प्रतिश्याय, अ‍ॅलर्जिक राइनायटिस, सायनसच्या तक्रारी तसेच वारंवार होणार्‍या सर्दीमध्ये जलनेतीचे महत्त्व विशद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हर्षल बोरोले यांनी स्वतः जलनेतीची क्रिया करून विद्यार्थी व उपस्थितांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.मार्गदर्शन करताना डॉ. कोमल पाटील यांनी सांगितले की, जलनेतीमुळे नासामार्ग स्वच्छ राहण्यास मदत होवून प्रतिश्याय, अ‍ॅलर्जी आणि सायनसच्या तक्रारी कमी होण्यास सहाय्य मिळते. योग प्रशिक्षक श्री. चैतन्य शिरसागर यांनी जलनेती करण्याची योग्य पद्धत, आवश्यक खबरदारी आणि त्यानंतर करावयाच्या योगक्रियांची सविस्तर माहिती दिली.जलनेतीमुळे नाकातील धूळ, प्रदूषणाचे कण व अतिरिक्त कफ दूर होण्यास मदत होते.

श्वसनक्रिया सुधारते, सायनससंबंधित त्रास कमी होतो तसेच मानसिक ताजेपणा आणि एकाग्रता वाढण्यासही सहाय्य मिळते, असे यावेळी सांगण्यात आले.याप्रसंगी डॉ. हर्षल बोरोले यांनी आयुर्वेद व योगशास्त्रातील दैनंदिन आरोग्य संवर्धनाच्या पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. निरोगी जीवनशैलीसाठी अशा शास्त्रोक्त क्रियांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.या उपक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयुर्वेद आणि योगशास्त्राच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now