खळबळ : चाळीसगावात आढळला महिलेला मृतदेह

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागे एका ७० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह संध्याकाळी आढळला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

child dead yawal jpg webp

१० जून रोजी शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीजवळ सुरक्षा रक्षक राजेंद्र कृष्णा पाटील हे त्या ठिकाणाहून जात असतांना त्यांना एका ७० वर्षीय अनोळखी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सुमारास आढळला

त्यांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान सदर वयोवृद्धाची ओळख अद्याप पटलेली नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना अमित बाविस्कर हे करीत आहे.

आम्हाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now