एचटीबीटी कापुस वाणाचे बनावट बियाणे विक्री करणाऱ्या.. वाचा सविस्तर  

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ ।  शासनाकडुन मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणुन विक्री करणाऱ्या अमळनेर तालुक्यातील कळुबु येथील  राजेंद्र धोंडुसिंह राजपुत यांचे विरुध्द बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार मारवड पोलीस स्टेशन येथे  9 जून,  रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

kapus biyani jpg webp

            जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव अरुण श्रीराम तायडे ,  तत्र अधिकारी, (गुनि) विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक कार्यालय, यांच्या समवेत  आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, यांच्या मार्गदर्शनाने तसेच कृषि सहाय्यक गणेश पाटील,  श्रीमती विद्या पाटील, कृषि विस्तार अधिकारी अमोल भदाणे, प.स. अंमळनेर यांच्या सहकार्यांने सापळा रचुन 62500/- किमतीचे 50 एचटीबीटी कापुस बियाणे पाकीटे जप्त केली आहेत.  

            खरीप हंगाम 2022 मध्ये अनधिकृत एचटीबीटी, अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये, तसेच या बियाण्यांची कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी लागवड करु नये, अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा मोबाईल क्र. 08468909641 व दुरध्वनी क्र. 0257-2239054 वर माहिती दयावी, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now