⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जिल्ह्यात ‘मुस्कान’ मोहिमेतून घेणार हरवलेल्या बालकांचा शोध

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । सर्वाेच्च न्यायालय, केंद्रीय गृह मंत्रालय, विषेश पोलिस महानिरीक्षक व महिला बाल अत्याचार प्रतिबंध विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३० जून दरम्यान जिल्ह्यात ‘मुस्कान ११’ मोहिम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत हरवलेल्या बालकांचा शोध घेतला जाणार आहे. या बालकांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी मोहिमेतून पार पाडली जाईल.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या संदर्भात आदेश दिले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगीता नारखेडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग, केशव स्मृती प्रतिष्ठानचा समतोल प्रकल्प यांच्या सहकार्याने ही मोहिम राबवली जाणार आहे. १ ते ३० जून या कालावधीत मुलांचे आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वे, बसस्थानक, रस्त्यावर व धार्मिक स्थळावर भीक मागणारी, कचरा गोळा करणारी मुले यांचा डेटा तयार करण्यात येणार आहे.