सावदा पालिका विविध कामासाठी 6 कोटीचा भरीव निधी : आ चंद्रकांत पाटील

जुलै 26, 2022 7:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । सावदा पालिकेच्या विविध विकास कामांसाठी नगर विकास खात्या तर्फे राज्य सरकारने एक परिपत्रका द्वारे वैशिष्ट्यपूर्ण काम अंतर्गत विशेष निधी म्हणून 6 कोटी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे सदर निधी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आ. चंद्रकांत पाटील यांचे विशेष प्रयत्नानी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

chandrakant patil


सदर कामात सावदा शहरारील विविध भागातील विकासकामे प्रास्तावीत करण्यात आले असून यात सावदा नगरपरिषद हद्दीतील रजा नगर भागात रस्त्याचे दुतर्फा गटारी बांधणे 15 लाख, काँक्रीटकरण करणे, रस्ते बांधणे 15 लाख, ईदगाह येथे काँक्रीटकरण 20 लाख, साईपार्क भागात काँक्रीटकरणे 20 लाख, स्वामी हॉस्पिटल ते हायवे पर्यत काँक्रीटकरण करणे 20 लाख, स्टेशन रोड भागात रस्ता मजबुती करणं व डांबरीकरण करणे 50 लाख, गट न 1569 ते 1546 पर्यंत रस्ता मजबुती करणं व डांबरीकरण करणे 45 लाख, रिंग रोड, रेस्ट हाऊस भागात रस्ता मजबुती करण व डांबरीकरण करणे 45 लाख, रजा नगर, पनापीर बाबा रस्ता व गटारी बांधणे 20 लाख, गट न 1525, जाम मळा भागात 300 मीटर आर, सी,सी गटार बांधणे 50 लाख, गौसियानगर भागात खडीकरण व डांबरीकरण करणे 50 लाख, गट न 97 मध्ये सांस्कृतिक सभागृह बांधणे 65 लाख, खुल्या हद्दीतील जागा विकसीत करणे 35 लाख, गौसिया नगर भागातील ओपन स्पेस विकसित करणे 30 लाख, शहीद अब्दुल हमीद चौक विकसीत करणे 15 लाख, खंडोबा मंदिरा जवळ संरक्षण भिंत बांधणे 25 लाख, नाना साहेब विष्णू हरी पाटील कन्या शाळेस संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे 20 लाख अश्या कामांचा समावेश असून निधी प्राप्त होताच सदर कामाच्या निविदा नगर पालिके मार्फत काढून काम करण्यात येणार आहे. या भरीव निधी मुळे कोरोना काळा नंतर मोठ्या प्रमाणात विकास कामांना निधी मिळाल्या नंतर सदर कामे मार्गी लागणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now