⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

सावदा पालिकेचे आरक्षण जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । सावदा पालिकेच्या २० जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकी साठी आज गुरुवारी दुपारी 3 वाजता पालिकेच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी भुसावळ रामसिंग सुलाणे यांच्यासह मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कार्यालय अधीक्षक सचीन चोळके हे होते.

यावेळी अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती साठी आधीच 3 जागे साठी आरक्षण निघालेल्या नुसार व उर्वरित 17 जागा साठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार 27% आरक्षणा नुसार 4.59 म्हणजे 5 जागा ओ.बीसीसाठी राखीव राहत असल्याने त्या 5 जागा व त्यात महिला साठी 50% म्हणजे 3 जागा अशी सोडत काढण्यात आली. यात प्रथम ओबीसी सर्व साधारण व नंतर ओबीसी महिला अशी सोडत निघाली. नंतर सर्व सर्वसाधारण महिला अशी सोडत निघत राहिलेल्या जागा सर्वसाधारण अश्या प्रकारे सोडत निघाली. येथील प्राथमीक शाळेच्या लहान मुलांचे हातून ही सोडत काढण्यात आली.

यात प्रभाग 1 अ – सर्वसाधारण महिला, 1 ब – सर्वसाधारण, 2 अ – ओबीसी 2 ब – सर्वसाधारण महिला, 3 अ – ओबीसी महिला, 3 ब – सर्वसाधारण, 4 अ – अनुसूचित जाती, 4 ब – सर्वसाधारण महिला, 5 अ – अनुसूचीत जाती महिला, 5 ब – सर्वसाधारण, 6 अ – सर्वसाधारण महिला, 6 ब – सर्वसाधारण, 7 अ – अनुसूचीत जमाती, 7 ब – सर्वसाधारण महिला, 8 अ – ओबीसी 8 ब – सर्वसाधारण महिला, 9 अ – ओबीसी महिला, 9 ब – सर्वसाधारण, 10 अ – ओबीसी महिला, 10 ब – सर्वसाधारण अश्या प्रकारे सदर प्रभाग आरक्षण आता असणार असून या आरक्षणास हरकती घेण्याची अंतीम मुदत दि. 1 जुलै असून दि 5 जुलै अंतीम प्रभाग रचना असणार आहे. सदर आरक्षण सोडतीसाठी लिपिक सतिष पाटील, वीमलेश जैन, किरण चौधरी, माळी सो, आदींनी सहकार्य केले तर आरक्षण सोडतीसाठी आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, नागरिक व पत्रकार बांधव उपस्थीत होते.