रावेरात दरोड्याच्या तयारीतील तिघे पोलिसांच्या जाळ्यात, शस्त्रांसह मुद्देमाल जप्त

जुलै 10, 2026 8:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर शहरात भरधाव वेगाने धावणाऱ्या एका संशयित कारमुळे गुरुवारी सायंकाळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयितांचा डाव उधळला गेला आणि रावेर पोलिसांनी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली. आरोपींकडून तलवार, लोखंडी टॉमी, स्क्रू-ड्रायव्हर, पिंचीस, सुती दोरी, बनावट नोटांची बंडले आणि कार असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

rvrdroda

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाल गावाकडून आभोडा मार्गे येणारी मारुती सुझुकी कार (एमएच-१९-२४०३) भरधाव वेगाने रावेर शहरातून जात होती. कारच्या वेगामुळे अनेक नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागला. संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांनी कारवर लक्ष ठेवले. आठवडे बाजार परिसरातील जुन्या नाल्याजवळ महामार्गाकडे वळताना कार चिखलात अडकल्याने संशयितांचा पुढील बेत फसला.

याच संधीचा फायदा घेत परिसरातील नागरिकांनी धाडस दाखवत कारमधील तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत आरोपींची ओळख निखिल प्रवीण पाटील (वय २०), अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. घोडबंदर, जि. ठाणे) आणि मेहेरबान जहागीर तडवी (रा. पाल) अशी झाली.

कारची झडती घेतल्यानंतर पोलिसांना दरोडा टाकण्यासाठी वापरली जाऊ शकणारी तलवार, लोखंडी टॉमी, स्क्रू-ड्रायव्हर, पिंचीस, सुती दोरी तसेच लहान मुलांच्या खेळातील बनावट नोटांची बंडले आढळून आली. याशिवाय सुमारे तीन लाख रुपये किमतीची कारही जप्त करण्यात आली. या साहित्याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या टोळीतील फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कामाला लागले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. या गुन्ह्याचा पुढी

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now