जळगावात १६ जुलैला ग्रामीण पशुधन उद्योजकता कार्यशाळा; दुग्ध व्यवसायातील संधींचे मार्गदर्शन

जुलै 14, 2026 4:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना जाहीर करण्यात आली आहे.

Livestock Entrepreneurship

या योजनेची माहिती व प्रचार-प्रसार करण्यासाठी कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी ‘दुग्ध उत्पादनातील संधी’ या विषयावर गुरुवार, दि. १६ जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तापी खोरे गोकेंद्रीत शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा राजू लोखंडे उपस्थित राहणार आहेत.

तसेच केशव प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीप दादा पाटील, विकास दूध फेडरेशनचे रोहित निकम तसेच जिल्हा दूध फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश मोरखडे उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील पशुपालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व शासकीय योजनेची माहिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रदीप झोड यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now