चारठाण्याच्या संदीप पाटलांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या 61 वे राज्यस्तरीय अधिवेशनात चारठाणा येथील मध्यामिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संदीप हरी पाटील यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे, राज्य अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील यांच्याहस्ते अहमदनगर येथील राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार वितरण समारोह झाला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव जी.आर.चौधरी, सर्व सन्माननीय कौन्सिल सदस्य, मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.पी.पाटील, राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रतिभा महिला शिक्षण प्रसारक मंडळ मुक्ताईनगर संस्थेचे संस्थाचालक प्रकाश देशमुख जाधव व सर्व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल संदीप पाटील यांचे अभिनंदन केले आहे.