आरोग्यबातम्याराष्ट्रीय

मोठी गुडन्यूज ! आता कॅन्सर होणार छुमंतर, रामबाण औषध तयार केल्याचा रशियाचा दावा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । कर्करोग, हा एक असा आजार आहे ज्याने जगभरातील लाखो लोकांचे आयुष्य प्रभावित केले आहे. या गंभीर आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान सतत प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, रशियाने एक मोठा दावा केला आहे ज्याने कर्करोगाच्या रुग्णांसाठीच नाही तर त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जगात कॅन्सरचा विळखा वाढत असताना हे संशोधन बहुमोल ठरले आहे. 

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी कर्करोगाविरुद्ध एक प्रभावी लस विकसित केली आहे. ही लस 2025 च्या सुरुवातीला बाजारात आणण्यात येणार आहे. रशियातील कॅन्सर रुग्णांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. परंतु जगभरात ही लस किती रुपयांना देण्यात येणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही.

रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख अँड्री काप्रिन यांनी या लसीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ही लस कर्करोगाच्या विविध प्रकारांवर प्रभावी असेल आणि रशियातील रुग्णांना मोफत प्रदान केली जाईल. हा दावा कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक मोठी आशा देतो आणि जगभरातील आरोग्य सेवा प्रणालीला एक नवीन दिशा दाखवतो.

दरम्यान, ही लस कॅन्सरवर किती प्रभावी ठरणार, कोणत्या कॅन्सरवर गुणकारी ठरणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही. कोणत्या वयाच्या रुग्णांवर त्याचा अधिक प्रभाव दिसेल याविषयीची माहिती काही दिवसात समोर येईल.

रशियात पण रुग्णांची मोठी संख्या
या वॅक्सिनचे, लसीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. जगातील इतर देशांप्रमाणेच रशियात पण कॅन्सर ही मोठी समस्या आहे. कॅन्सरचे रूग्ण सातत्याने वाढत आहेत. 2022 मध्ये 6,35,000 हून अधिक रुग्णांची नोंद या काळात झाली आहे. या देशात स्तन, फुप्फुसांचा कर्करोग वाढला आहे. ही लस केवळ ट्युमरची गती कमी करणार नाही तर तिचा आकार सुद्धा कमी करेल.

काय होता पुतिन यांचा दावा?
काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी वैज्ञानिक कर्करोगावरील लस तयार करण्यात रशिया अगदी जवळ असल्याचा दावा केला होता. नवीन पिढीच्या इम्युनोमोड्युलेटरी औषधाची निर्मिती करत असल्याचे ते म्हणाले होते. इम्युनोमोड्युलेटरी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध. ही लस शरीराला कर्करोग, संसर्ग अथवा इतर रोगांशी लढण्यास मतद करणारी असेल असा दावा आहे. मॉस्को फोरम ऑन फ्यूचर टेक्नॉलॉजीच्या मंचावरून त्यांनी या लसबद्दल घोषणा केली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button