रोटरी क्लब इस्टतर्फे बालगृहात बालकांना पादत्राणे भेट देऊन वाढदिवस साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । जळगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आणि बालकांचे चाहते हितेश्वर मोतिरामाणी यांचा वाढदिवस दरवर्षाप्रमाणे बालकांसोबतच साजरा करावा असा मानस असल्यामुळे  वायफळ खर्च न करता आणि सामाजिक विलगीकरणाचे पालन करत अनाथ, निराधार मुलां मुलींच्या संस्थेत साजरा केला.

 या निमित्ताने पर्यावरण संतुलनासाठी आणि संस्था परिसरात निसर्गरम्य वातावरण तयार होण्यासाठी विविध प्रकारचे दहा झाडांचे वृक्षारोपण केले. तसेच बालकांना अत्याश्यक लागणारे पादत्राणे भेट दिली आणि त्यांची आवडती बिस्किटे; फरसाण; चॉकलेट; केक वाटप केले. मुलांसमवेत वाढदिवस साजरा  केल्यामुळे फारच आत्मिक समाधान वाटत असल्याचे सांगीतले .संस्थेतील बालकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब इस्टचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यतसेच सौ.नेत्रा मोतिरामाणी, सौ.हेमवती मोतीरामाणी, सौ.रेखा हुंदानी, सौ.पल्लवी बोरसे, संजय भावसार, जितीन जानी, पराग भवर, विपुल पांड्या, उपस्थीत होते. संस्थाचालक दादासो.प्रभाकर पाटील यांनी वाढदिवस संस्थेत साजरा केल्यामुळे आणि मुलांच्या बालकांसाठी मोलाची मदत केल्यामुळे मनस्वी आभार मानले.

कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, गणेश पंडीत, सौ.अरूणा पंडीत, यांनी परिश्रम घेतले.