⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

त्या’ कथित ऑडीओ क्लिपबाबत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, काय म्हणाले वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची जिल्हा परिषद भरतीबाबत विद्यार्थ्यासोबत झालेले संभाषणाचे एक ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये विध्यार्थी महाजन यांना जिल्हा परिषदेची परीक्षा कधी होणार यासंदर्भात विचारणा करत आहे. मात्र यामध्ये महाजन यांनी अत्यंत अर्वाच्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे विविध स्तरातून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, आता यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या संदर्भात गिरीश महाजन यांना विचारणा केली असता त्यांनी यावेळी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “मला शिक्षक भरती विषयासंदर्भात जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असून कालपासून जवळपास ४०० ते ५०० फोन कॉल्स या विषयासंदर्भात आले आहेत. मला जाणीवपूर्वक कॉल करुन त्रास दिला जात असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

हा विषय माझा नसून हे सर्व काम शिक्षण विभाग बघत असतं ज्याचे मंत्री दीपक केसरकर आहेत. शिक्षक भरती संदर्भात कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली असून लवकरच शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होऊन शिक्षक भरती केली जाईल, असं गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

काय आहे ऑडिओ क्लिपमधील संभाषण?
महाजन यांना फोन लावून तरुणाने म्हंटले की, “साहेब झेडपीची फाईल तुमच्याकडे आहे. तेवढं बघा ना सर. मुलं खूप डिप्रेशन आहेत.”यावर महाजन म्हणाले, तुम्हाला कामं नाहीत का रे काही. दिवसभरातून ५०० फोन करता. मी काही ते करत नाही. रद्द केली मी ते. “यानंतर विद्यार्थ्याने म्हंटले की, “अहो साहेब मुलं डिप्रेशनमध्ये आहे.” तर यावरही महाजन म्हणाले की, रद्द केले ते, ठेव फोन.