⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुक्ताईनगरात शिवसेनेला धक्का : माजी शहरप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात अलीकडच्या काळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज आमदार पाटील यांचे समर्थक तथा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाळाभाऊ भालशंकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. येथे खडसे आणि पाटील गटात आरोप-प्रत्यारोग रंगले असतांनाच आज शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाळाभाऊ भालशंकर यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर शिवसेना माजी शहर_प्रमुख बाळाभाऊ भालशंकर यांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा आणि आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, राजू माळी, प्रवीण पाटील, बापू ससाणे, विनोद सोनवणे, दीपक साळुंके, योगेश काळे, सोनू पाटील, संजू माळी, नंदू हिरोळे, प्रकाश खेवलकर, अप्पा नाईक, श्रवण पाटील आदी उपस्थित होते.