⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | … अखेर ती काटेरी झुडपे काढुन सा.बा. विभागाकडुन रस्ता मोकळा, नऊ महिन्यानंतर घेतली दखल..

… अखेर ती काटेरी झुडपे काढुन सा.बा. विभागाकडुन रस्ता मोकळा, नऊ महिन्यानंतर घेतली दखल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । २४ जुलै २०२३ । मुक्ताईनगर तालुक्यातुन असणाऱ्या मलकापुर-बुरहाणपुर महामार्गावरील पुरनाड फाटा ते डोलारखेडा फाटा तसेच साखर कारखाना पर्यंतच्या रस्त्याच्या साईडपट्ट्यावर दोन्हीं बाजुने वाढलेली काटेरी झुडपे व गवत यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत होती.अनेकांनी संबंधितांकडे तक्रारी करुन सुद्धा दखल घेतली जात नसल्याने वाहनधारकांत तीव्र संताप होता.तसेच वळणरस्त्यांवर अनेकदा झुडपांआडुन समोरील वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडल्याच्या घटनाही घडल्या.

दरम्यान काही अपघातात वन्यप्राण्यांना ही जीव गमवावा लागला. याबाबत सुकळी येथील पत्रकार सुभाष धाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपले सरकार पोर्टलवर केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली असुन सा.बा.विभागाकडुन रस्त्याच्या दोन्हीं बाजुने जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा केला जात आहे. रस्त्यात लांबलेली झुडपे, फांद्या ,गवत काढले जात आहे. विभागाकडून रस्ता मोकळा होत असल्याचे फोटोसह पोहच तक्रारदार सुभाष धाडे यांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आली.

तब्बल नऊ महिन्यानंतर घेतली गेली दखल. ऑक्टोबर २०२२ मध्ये या गंभीर प्रकाराबाबत सुभाष धाडे यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार दिली होती तसेच याविषयी वृत्तही दिले होते मात्र नऊ महिने सा.बां.विभाग सुस्तावलेला राहिला.परंतु पुरनाड फाट्यालगत राशा वळणावर असलेल्या झुडपांआडुन समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने आतापर्यंत अनेक अपघात घडले तसेच रस्ता ओलांडताना घडलेल्या अपघातात अनेक वन्यप्राण्यांनाही जीव गमवावा लागला.

अखेर तब्बल नऊ महिन्यानंतर सा.बा.ने दखल घेत रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केला. अपघातांना निमंत्रण देणारी अनावश्य झुडपे काढली जात असल्याने वाहनचालकांत संतोषाचे वातावरण आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.