⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | परिवर्तन स्वीकारले तरच प्रगती ; पल्लवी जाधव

परिवर्तन स्वीकारले तरच प्रगती ; पल्लवी जाधव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज |२३ एप्रिल २०२२ । आजच्या काळात आपल्याला कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर प्रत्येक क्षेत्रातील होणारे परिवर्तन हे स्वीकारावे लागेल तरच आपली प्रगती निश्चित आहे. असे प्रतिपादन पल्लवी जाधव यांनी केले. बेंडाळे महाविद्यालयात आयोजित ‘युवतींना मनोरंजन क्षेत्रातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

पल्लवीने बॉलीवूड चित्रपट सृष्टीच्या रुपेरी पडद्यावर आपली छटा उमटवत गंगुबाई काठीयावादी आणि मर्दानी या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. विद्यार्थिनींसोबतच्या आपल्या संवादात पल्लवीने बेंडाळे महिला महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग ते नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा सह नाट्य व चित्रपट क्षेत्रातील तिचा प्रवास उलगडला. तुम्हाला आपल्या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर तर त्या क्षेत्रात होणारे परिवर्तन स्वीकारा असे पल्लवी जाधव यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ गौरी राणे यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या फिल्म मेकिंग अँड ड्रामाटिक्स विभागासह विविध कौशल्य विभागांची माहिती विद्यार्थिनींना देत पल्लवी सारखे उत्तम कलाकार व्हायचे असेल तर महाविद्यालय विद्यार्थिनींना नक्कीच प्रोत्साहन व मदत करेल असे सांगितले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचर्या डॉ.गौरी राणे, माजी विद्यार्थिनी समितीच्या अध्यक्षा डॉ.मनीषा पाटील आणि इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सायली पाटील यांनी मानले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.