जळगाव लाईव्ह न्यूज । Prathyusha Garimella Death । सुशांत सिंग प्रकरणा नंतर आता पुन्हा एकदा बॉलीवूड हादरलं आहे. कारण सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा शनिवारी ११ जून रोजी निधन झालं. तिचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. ती ३५ वर्षांची होती. हैद्राबाद येतील तिच्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळला आहे.पोलीस तापास सुरु आहे.

हायद्राबाद येथील बंजारा हिल्स परिसरातील फिल्म नगर या भागामध्ये प्रत्युषा राहत होती. प्रत्युषाच्या बेडरुममध्ये कार्बन मोनोऑक्साइड मिळालं आहे. तपास सुरु असताना हा संशयास्पद मृत्य असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाबाबत तपास करण्यास सुरुवात केली आहे.

प्रत्युषाच्या निधनाची बातमी सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिली. सुरक्षा रक्षकाला काहीतरी विचित्र प्रकार घडत आहे याची जाणीव झाली. त्याने प्रत्युषाला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना बाथरुममध्ये प्रत्युषा मृतावस्थेत आढळली.











