कुंभारखेडा येथे महादेव मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा

जुलै 31, 2022 9:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । कुंभारखेडा (ता.रावेर) येथील महादेव मंदिरात शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा केली जात आहे.या ठिकाणी स्थापन होणाऱ्या मूर्तीची गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती.तर विधिवत पूजन आणि महारुद्र पूजा यज्ञ आहुती संस्कार धोंडू महाराज यांच्या सानिध्यात होत आहे.

येथील महादेव मंदीरात तीन दिवशीय प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.पुरातन मंदिरात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून,तीन दिवशीय मंत्रोच्चार व यज्ञ आहुती असे कार्यक्रम सुरु आहे.या कार्यक्रमाचे पौरहित्य धौंडू महाराज व जिल्ह्यातील शास्त्री करत आहे.यज्ञात प्रदीप पाटील,पी के बोंडे,रवी चौधरी,रमेश गुप्ता,मुरलीधर राणे,शरद चौधरी,नकुल पाटील,नितीन पाटील,रितेश पाटील,बाळू बोदडे,अनिल पाटील,सुनील पाटील,लीलाधर चौधरी आदी जोडपी सहभागी झाले आहे.मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेसाठी महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले. रविवारी गावातून भव्य शोभायात्रां काढण्यात आली होती यात मोठ्या संखेने महिला पुरुष भाविक सहभागी झाले होते.

Kumbharkheda jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now