जामनेर येथील ‘विकासो’साठी आज हाेणार मतदान

एप्रिल 17, 2022 9:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । जामनेर विकासोच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ रोजी मतदान होणार आहे. त्यात कोण बाजी मारते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ellection jpg webp

२०२२ ते २०२७ या पाच वर्षांसाठी निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळाचे सहकार पॅनल आहे. विद्यमान संचालक मंडळ आमदार गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार ईश्वर जैन यांच्या नेतृत्वात काम करत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या या संस्थेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूने सर्वपक्षीय पॅनल समोरासमोर उभे आहे. एकूण १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात सहकार पॅनलने सर्व जागांवर, तर शेतकरी पॅनलने १० जागांवर उमेदवार दिले आहेत. सर्वसाधारण गटात शेतकरी पॅनलने एक उमेदवार दिलेला नाही. १७ रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा, वाकी रोड या ठिकाणी मतदान होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now