15 दिवसांत पेट्रोल 9.20 रुपयाने महागले, जाणून घ्या आजचा प्रति लिटरचा दर

एप्रिल 5, 2022 10:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या जवळपास असतानाही भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याचा ट्रेंड थांबत नाही. देशात दररोज वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे जनता हैराण झाली आहे. तेल कंपन्या हळूहळू दर वाढवून महागाईचा फटका सर्वसामान्यांना देत असल्याचे दिसून येत आहे.

petrol diesel

15 दिवसांत 12व्यांदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आज सकाळी सहा वाजल्यापासून लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ जाहीर केली आहे. 15 दिवसांतील ही 13वी वाढ आहे. या वाढीमुळे आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांची वाढ झाली आहे.

या वाढीमुळे जळगावात पेट्रोलचा प्रति लिटरचा दर १२० रुपयावर गेला आहे. तर डिझेलचा दर १०३ रुपयांवर गेला आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 119.67 रुपये आणि 103.92 रुपये आहेत. आणि राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.61 रुपये, तर डिझेलची किंमत 95.87 रुपये प्रति लीटर झाली आहे.

दोन आठवड्यात 13 वाढ
तेल कंपन्यांनी 15 दिवसांत 13 वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. 22 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत पेट्रोल प्रतिलिटर अनुक्रमे 80, 80, 80, 80, 50, 30, 80, 80, 80, 80, 80, 40, 80 पैशांनी महागले आहे. नव्या वाढीमुळे आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांची वाढ झाली आहे. कृपया लक्षात घ्या की स्थानिक करानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात.

तेलाच्या किमती दररोज अपडेट केल्या जातात
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now