होंडाची नवी धमाकेदार बाईक भारतीय बाजारात लाँच! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सप्टेंबर 22, 2026 2:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही नवीन होंडा कंपनीची बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. Honda Motorcycle and Scooter India ने भारतीय बाजारात प्रतीक्षित आपली नवी Honda CB500 मोटरसायकल अधिकृतपणे लाँच केली आहे. निओ-रेट्रो डिझाइन असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत २.७५ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. Honda CB500 तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, या बाईकसाठी Honda BigWing डीलरशिपवर बुकिंग सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या बाईकची निर्मिती भारतातच केली जात आहे.

Honda CB500

तीन आकर्षक व्हेरिएंट्स आणि किंमती

होंडाची ही नवी बाईक एकूण तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात Alloy, Spoke आणि Spoke with Stripe असे तीन व्हेरिएंट असून बेस Alloy व्हेरिएंटची किंमत २.७५ लाख रुपये आहे. तर Spoke व्हेरिएंटसाठी २.९९ लाख ९०० रुपये आणि टॉप-स्पेक Spoke with Stripe व्हेरिएंटसाठी ३.०१ लाख ९०० रुपये मोजावे लागतील. या सर्व किंमती बंगळुरू येथील एक्स-शोरूम किंमती आहेत.

Spoke व्हेरिएंटमध्ये क्रॉस-स्पोक ट्यूबलेस व्हील्स देण्यात आले आहेत. तर टॉप व्हेरिएंटमध्ये खास रंग आणि ग्राफिक्स मिळतात. विशेष म्हणजे, Honda CB500 चे उत्पादन भारतातच करण्यात येत आहे.

501cc इंजिन, 43.3Nm टॉर्क

Honda CB500 मध्ये कंपनीने ५०१cc चे नवीन सिंगल-सिलिंडर इंजिन दिले आहे. हे एअर आणि ऑइल-कूल्ड इंजिन असून, ते सुमारे २८hp पॉवर आणि ४३.३Nm पीक टॉर्क निर्माण करते.

मोठ्या क्षमतेच्या सिंगल-सिलिंडर इंजिनमुळे CB500 ला भारतीय बाजारात वेगळी ओळख मिळणार आहे. ५००cc सेगमेंटमध्ये Royal Enfield ने २०२० मध्ये आपली 500cc UCE इंजिन असलेली मॉडेल्स बंद केल्यानंतर हा सेगमेंट तुलनेने मोकळा झाला होता. आता Honda ने निओ-रेट्रो लूक आणि दमदार टॉर्कसह या सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.

आधुनिक फीचर्सचा समावेश

रेट्रो लूक असला तरी Honda CB500 मध्ये आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. बाईकमध्ये Honda Selectable Torque Control (HSTC), स्लिपर क्लच, अॅनालॉग-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि Honda RoadSync स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी हे फीचर्स स्टँडर्ड देण्यात आले आहेत.

Honda ने जुलै २०२६ मध्ये भारतातील आपल्या उत्पादन प्रदर्शनादरम्यान CB500 पहिल्यांदा सादर केली होती. ही मोटरसायकल कंपनीच्या CB350 रेंजपेक्षा वरच्या स्तरावर असून भारतीय बाजारासाठी स्थानिक पातळीवर तयार केली जात आहे.

Honda CB500 साठी बुकिंग सुरू झाले असून, इच्छुक ग्राहक Honda BigWing डीलरशिपच्या माध्यमातून या मोटरसायकलची बुकिंग करू शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now