संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र

सप्टेंबर 22, 2026 3:32 PM

डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (जीआयएमआर), जळगाव येथे प्राध्यापकांच्या अध्यापन, संशोधन आणि व्यावसायिक कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी विशेष ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (एफडीपी) आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्रातील ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक तथा रिसर्च गाईड डॉ. दिलीप संतोष चव्हाण यांनी उपस्थित प्राध्यापक व संशोधकांना मार्गदर्शन केले.

dr dilip chavan

प्रारंभी संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते डॉ. दिलीप चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. चव्हाण यांना अध्यापन क्षेत्रातील २० वर्षांहून अधिक अनुभव असून, त्यांच्या नावावर ७४ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी विविध विषयांवर पुस्तकलेखन केले आहे.मार्गदर्शनपर सत्रात डॉ. चव्हाण यांनी नीतिमत्ता, पारदर्शकता, कमिटमेंट आणि संघभावना या मूल्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक जीवनातील महत्त्व स्पष्ट केले.

शिक्षकाची भूमिका केवळ वर्गखोलीपुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये योग्य मूल्यांची रुजवणूक करण्याचीही आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आदरयुक्त व सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, तसेच शैक्षणिक क्षेत्रात नैतिक मूल्ये आणि व्यावसायिक बांधिलकी जपावी, यावर त्यांनी विशेष भर दिला.संशोधन क्षेत्रातील विविध पैलूंवरही डॉ. चव्हाण यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शोधनिबंध लेखन, संशोधनाची गुणवत्ता, पेपर प्रेझेंटेशन तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संशोधन मांडण्याचे कौशल्य याबाबत त्यांनी उपयुक्त माहिती दिली.

तुर्की येथे झालेल्या ऑनलाइन संशोधन सादरीकरणाचा संदर्भ देत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन सादर करताना विषयाची निवड, मांडणी, सादरीकरण कौशल्य आणि संशोधनाची गुणवत्ता यांना असलेले महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमात प्राध्यापक, संशोधक आणि संबंधित शैक्षणिक घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now