जळगावात परप्रांतीय नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल ; पाच महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

सप्टेंबर 22, 2026 3:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरात राहणाऱ्या एका परप्रांतीय नवविवाहितेने राहत्या घरात गळ@#फास घेऊन आत्म@#हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. झीलीक तपन मंडल (रा. पश्चिम बंगाल) असं मयत महिलेचं नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

zilik mandal

झीलीक हिचा विवाह अवघ्या पाच महिन्यांपूर्वी सनाजीत नारायणचंद्र संत्रा यांच्याशी झाला होता. लग्नानंतर महिनाभरापूर्वीच हे नवदांपत्य रोजगाराच्या निमित्ताने जळगाव शहरात राहण्यासाठी आले होते. पती सनाजीत हे शहरातील एका सराफा दुकानात सोने कारागीर म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. नव्या संसाराला सुरुवात होऊन फारसा काळ लोटलेला नसतानाच हा काळा घाव बसल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

किरकोळ वादातून टोकाचे पाऊल

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी पती-पत्नीमध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर पती सनाजीत हे त्यांच्या मालकाकडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते. पती घराबाहेर गेल्यानंतर झीलीक मंडल हिने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला आणि विच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, विवाहितेने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे टोकाचे पाऊल उचलले, यादरम्यानचा नेमका घटनाक्रम काय होता, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now