जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । येथील रामानंदनगरातील श्रीगणेश गजानन मंदिर व गजानन हौसिंग सोसायटीमध्ये दि ३० एप्रिल ते ९ मे या कालावधीत प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांतून सांगण्यात आले.
यात जीवनविद्या मिशनचे सद्गुरू वामनराव पै यांचे शिष्य संतोष तोत्रे (पुणे) हे सुखी जीवनाचे गुपीत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजक जीवनविद्या मिशन शाखेतर्फे सांगण्यात आले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज