⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

एक एकरातील ऊस जळून खाक, दिड लाखांचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील भोरस शिवारात एका शेतकऱ्याच्या एक एकर शेतातील ऊसाला अचानक आग लागल्याने ऊस जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. याघटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चैतन्य तांडा येथील ग्रामपंचायत सदस्य राजू उत्तम चव्हाण यांची भोरस शिवारात एक एकर जमीन आहे. त्यात त्यांनी ऊसाची लागवड केलेली आहेत. मात्र आज अचानक आग लागल्याने उभा पिक जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. यात ठिबकांसह सुमारे दिड लाखांचा नुकसान झाल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान आग लागल्याचे कळताच माजी चेअरमन दिनकर राठोड हे राजू चव्हाण यांच्यासोबत घटनास्थळी धाव घेऊन ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सहाय्याने अग्नीशमन दलाला संपर्क केला. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत अग्नीशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. मात्र आग एवढी भिषण होती की, आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमनच्या वाहनाला खूप परिश्रम घ्यावे लागले. दरम्यान या घटनेने परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच शासकीय कर्मचारी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा केला. दरम्यान या घटनेने चव्हाण कुटुंबांवर अक्षरशः दुःखांचा डोंगर कोसळले आहे. यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे.