आता पावर बॅंक वापरण्याची गरज नाही; करा ‘या’ शूजने मोबाईल चार्जिंग

एप्रिल 5, 2022 3:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । जग आता डिजिटल युगामध्ये वावरत आहे. या डिजिटल युगामध्ये सर्व काही वस्तूच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बघायला मिळतात. परंतु अशी एक नवीनच वस्तू बाजारामध्ये आली आहे ज्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

power bank jpg webp

इंटरनेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य सोपे करून टाकले आहे. स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, स्मार्ट कार, स्मार्ट होम, स्मार्ट स्पीकर्स अश्या या लांबलचक यादीत आता स्मार्ट शूजचा प्रवेश झाला आहे. आयएक्सआयजीओ (एग्झीगो)ग्रुपचे सीईओ आलोक वाजपेयी यांनी प्रथम ही माहिती ट्रॅव्हल पोर्टल वर दिली आहे.

शूज एक्स असे या स्मार्ट शूजचे नामकरण केले गेले आहे. या बुटात वॉटर प्रुफ युएसबी चार्जिंग पोर्ट दिले असून त्यावर स्मार्टफोन चार्ज करता येतात. खाली बॅटरी आहे. बुटात १२ एमपीचा फ्रंट कॅमेरा असून त्याच्या मदतीने सेल्फी घेता येतात शिवाय बॅक ला अल्ट्रा वाईड सेन्सर दिला गेला आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या संशयित व्यक्तीची कल्पना येते. अँटी थ्रेप्ट सेन्सर मुळे चोरी होण्यापासून बचाव होऊ शकतो. जी कुणी व्यक्ती तुमच्याजवळ येऊन एखादी वस्तू चोरी करण्याचा प्रयत्न करेल त्या व्यक्तीची माहिती मिळते आणि स्मार्टफोनच्या सहाय्याने त्याला ट्रॅक करता येते.

यात ऑटोवॉर्मिंग सेल दिले गेले आहेत त्यामुळे उणे २० तापमानात सुद्धा तुमची पावले गरम राहतात. यात क्यूआर कोड स्कॅनर आहे त्यामुळे कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून त्या वस्तूचे पेमेंट करता येते. यातील ट्रॅकिंग ॲप मुळे तुम्ही किती पावले चाललात, किती कॅलरी जाळल्या याची माहिती मिळते. हे शूज स्टॉक असेपर्यंतच मिळणार आहेत. त्यासाठी शूजएक्स डॉट इन वर बुकिंग करावे लागेल. बुटाच्या किमतीचा खुलासा केला गेलेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now