नचिकेत ठाकूरची अंडर १९ बॉईज कॅम्पसाठी निवड

एप्रिल 30, 2022 3:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही अधिकृत क्रिकेट अकादमी आहे. भारतीय फलंदाज, व्हीव्हीएस लक्ष्मण हे अकादमीचे सध्याचे क्रिकेट प्रमुख आहेत. संपूर्ण भारतातून निवडक मुलांची या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. यात नचिकेत ठाकूर चा समावेश करण्यात आला आहे.

निवड 7 jpg webp

महाराष्ट्रातून ५ खेळाडूंनी निवड करण्यात आली असून त्यात नचिकेत ठाकूरची निवड ही जैन स्पोर्ट्स अकादमी व जळगाव जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे हे शिबिर ९ मे ते २ जूनदरम्यान होणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी शिबिरात सहभागी होणारा नचिकेत ठाकूर हा जैन स्पोर्ट्स अकादमीचा चौथा खेळाडू आहे. नचिकेत ठाकूरचा जैन स्पोर्ट्स अकादमीचे संचालक अतुल जैन, क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल, मुश्ताक अली, तन्वीर अहमद आदींनी गौरव केला आहे. तसेच त्यांच्या यशाचे काैतूक हाेत अाहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now