जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । मी आमदार झाल्यापासून खडसे पिता-पुत्रीला डोईजड होत असल्याचे वाटत असल्याने त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रचंड घृणा निर्माण झाली आहे. ते केव्हा माझा घातपात करतील हे सांगता येत नाही. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापासून असुरक्षित आहे. याबाबत मी पोलीस अधिक्षकांना सांगितले असून मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याची माहिती मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी सांगितले.

बातमीच्या शेवटी व्हिडीओ पाहता येईल.
मुक्ताईनगर (Muktainagar News) येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकारानंतर ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आ.चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (SP Pravin Mundhe) यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आ.पाटील म्हणाले की, गुन्हे खरे असो की खोटे ते दाखल होणे हे त्रासदायकच आहे. एखादा आयपीएस दर्जाचा अधिकारी नेमून त्याची चौकशी व्हायला हवी, असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : नाथाभाऊंना शिवीगाळ, रोहिणी खडसेंशी अरेरावी : राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या घरी सेनेचा राडा
आ.पाटील पुढे म्हणाले, रोहिणीताईंना काल घडलेल्या प्रकारात केवळ त्यांच्याच पक्षातील महिलेवरील अन्याय दिसतो आहे. कालच्या प्रकारात दोन्ही बाजूने महिलांची तक्रार दाखल आहे. घटना काय ते पोलीस तपासात निष्पन्न होईल पण त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने गुंड कोण हे तुमच्या लक्षात आले असेल. एखाद्या लोकप्रतिनिधीला चोप देऊ अशी भाषा गुंडगिरीची असू शकते. मी यापूर्वी देखील सांगितले आहे की, यांची द्वेष बुद्धी, यांनी द्वेष भावनेतून केलेल्या कारवाया, खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती, माझ्यावर यापूर्वी देखील यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांनी खदखद बोलून दाखवली असून केव्हा हे एकदाचे आमदाराला निपटून टाकता असे झाले आहे.
आ.पाटील म्हणाले, एखाद्या लोकप्रतिनिधीने समाजाला संदेश द्यायचा असेल तर शांततेचा संदेश द्यायला हवा. असे चोपणे चापण्याची भाषा त्यांच्या तोंडून शोभत नाही. महिलांवर अन्याय करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही पाठीशी घालणार नाही. घटना खरी की खोटी हे कळू द्या, घाई कशाला करतात. खडसे आणि त्यांच्या कन्या यांना कोण ओळखत नाही. त्यांच्या एका फोनवर देखील गुन्हा दाखल होईल. त्या रात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसून होत्या. त्यांनी काय गोंधळ घातला हे सर्वांनी पाहिले असल्याचे आ.चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे देखील वाचा :
- जळगावात काँग्रेसची अंतर्गत गटबाजी समोर ; जिल्हा बैठकीत जोरदार राडा
- अन् विधानपरिषदेत एकनाथ खडसे संतापले ; म्हणाले..
- केंद्राकडून खासदारांच्या पगार मोठी वाढ; आता खासदारांना दरमहा ‘एवढा’ पगार मिळेल?..
- चार पक्ष फिरून येऊन तुम्ही.. ; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांना सुनावलं
- जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का ; अनेक दिग्गज नेते, पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश