---Advertisement---
गुन्हे मुक्ताईनगर

मुक्ताईनगरजवळ ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२५ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून याच दरम्यान आता मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ ते २० जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

muktainagar accide

या भीषण अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

---Advertisement---

प्राथमिक माहितीनुसार, जळगावहून अकोल्याकडे निघालेली ट्रॅव्हल्स बस ट्रकला जोरदार धडकली. ट्रॅव्हल्सचा समोरील भाग अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १५ ते २० प्रवाशी जखमी झाली. धडक झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली.


अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment