जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । गेल्या चार वर्षांपूर्वी भाजपला (BJP) रामराम ठोकत माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादीत (NCP) दोन गट पडल्यानंतर एकनाथ खडसे शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासोबत राहिले. लोकसभा निवडणुकीदरम्यान खडसेंनी भाजपात प्रवेश करणार असल्याचं खुद्द जाहीर केलं होते. मात्र काही ना काही कारणाने त्यांचा भाजप प्रवेश रखडला. यातच राज्यात एकीकडे शरद पवार व अजित पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना एकनाथ खडसेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची ऑफर अजित पवार गटाच्या नेत्याने दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात त्याचीच चर्चा सुरु आहे.

जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या बैठकीत राज्याचे सहकार मंत्री व अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. विशेष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनीही खडसेंना ऑफर दिली.
दरम्यान सहकार मंत्र्यांनी दिलेल्या या ऑफरवर बोलताना एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आले तर मीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार, असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केली आहे. दरम्यान ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली त्याचवेळी अजित पवारांसोबत येण्याची अमोल मिटकरींनी आपल्याला ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला असून मात्र मी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचेही एकनाथ खडसेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.