जळगावच्या राजकारणात मोठी घडामोड ; सुरेश जैन आणि संजय राऊतांची 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा

मे 31, 2025 1:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२५ । जळगावच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर आलीय. ती म्हणजे जळगाव दौऱ्यावर आलेल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश जैन यांची भेट झाली आहे. भेटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विमानतळावर 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली असून यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

suresh jain sanjay raut

खरंतर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत हे शुक्रवारी रात्री मुंबईहून विमानाने जळगावी दाखल झाले. त्याचवेळी विमानतळावरील प्रतिक्षा कक्षात आधीच थांबून असलेले माजी मंत्री सुरेश जैन आणि त्यांची औपचारीक भेट झाली.

भेटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विमानतळावर 15 मिनिटे बंददाराआड चर्चा झाली. दरम्यान, राजकीय अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र आता आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी जळगावत आलेल्या संजय राऊतांची भेट झाल्यामुळे व बंदद्वार चर्चा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वर्तवले जात आहेत.

दरम्यान एकेकाळी शिवसेनेचे नेते आणि मंत्री असलेले जैन भेटल्यानंतर राऊत यांनी त्यांची आस्थेवाईक चौकशी केली. सुरेश जैन आमचे जुने नेते आणि मार्गदर्शक आहेत. ते अजून थकलेले नाहीत, असे राऊत म्हणाले. आमच्या दोघांमधील आगामी निवडणुकांच्या चर्चेबाबत तुम्हाला लवकरच कळेल, असे विरोधकांना कोड्यात टाकणारे वक्तव्य राऊत यांनी केले.

दुसरीकडे, संजय राऊत आमचे जुने मित्र आहेत. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली. राजकीय विषयावर कोणतीच चर्चा आमच्यामध्ये झालेली नाही. राजकारणातही मी पुन्हा सक्रीय होणार नसल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री जैन यांनी दिली. याप्रसंगी ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे देखील उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment