भाजपमधून शिवसेनेत उन्मेष पाटील, करण पवार कुठेय? संजय राऊत म्हणाले, ते..

मे 31, 2025 3:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२५ । आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आजपासून दोन दिवस जळगाव दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांनी पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक तयारी याबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मनोज जामसुतकर, राज्य संघटक साळुंखे, संजय सावंत, शरद तायडे, कुलभूषण पाटील, गुलाबराव वाघ, दिलीप चौधरी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

raut patil

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांना भाजपमधून शिवसेनेत आलेले माजी खासदार उमेश पाटील आणि करण पवार हे सोबत दिसत नसल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “ते आमच्यासोबतच आहेत, कदाचित मागच्या गाडीत असावेत,” असे उत्तर दिले. मात्र पत्रकार परिषद संपेपर्यंत हे दोघेही नेते त्या ठिकाणी प्रत्यक्षात हजर नव्हते.

त्यानंतर संजय राऊत म्हणाले, “करण पवार यांच्यावर जळगाव लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे. तसेच लवकरच माजी खासदार उमेश पाटील यांनाही महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल.” मात्र, त्या जबाबदारीबाबत कोणताही अधिकृत खुलासा त्यांनी केला नाही. या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आणि चर्चा सुरू असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दौऱ्यात प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment