माझ्या सख्ख्या भाच्याला गिरीश महाजनांनी… एकनाथ खडसेंचा बॉम्बगोळाने राजकीय वर्तुळात खळबळ

जून 3, 2025 10:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२५ । शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एक गंभीर आरोप केले आहे.ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माझ्या सख्ख्या भाच्याला मंत्री गिरीश महाजन यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागले असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसेंनी केलेल्या या आरोपांनी खळबळ उडाली आहे.

girish mahajan and eknath khadse jpg webp

नेमकं प्रकरण काय?
कुरुंदकर याच्यासोबत बोलण्यावरून आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्या सारख्यांनी माझ्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण 7 वर्ष कारागृहात काढावे लागले, असा आरोपच खडसे यांनी केला आहे. निर्दोष सुटून आल्याच्यानंतर त्याने कारागृहाच्या ठिकाणी अतिशय नित्कृष्ट दर्जाचे जेवण कैद्यांना दिले जात असल्याचं आपल्याला सांगितले, असे यावेळी एकनाथ खडसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जळगाव कारागृहात पुरवण्यात येत असलेल्या वस्तूंमधून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या घोटाळ्यामध्ये ठेकेदाराला जळगावातील एका मंत्र्याची साथ असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला आहे. पण त्यांनी त्या मंत्र्यांचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे याबाबत आमदार एकनाथ खडसे यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे, वाढत्या किंमतीने टेंडर घ्यायचे. खाली निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवायचे ही त्यांची मोडस ऑपरेंडी राहिलेली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला अशी तक्रार आहे.

मी या प्रकरणाची माहिती घेत आहे. माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत हा मुद्दा मांडणार आहे. मी चौकशीची मागणी करणार आहे. मी जेलमधील घोटाळा प्रकरणाबाबत कोणाचे नाव घेतले नाही. राजू शेट्टी यांनी घेतले. लेकी बोले सूने लागे. ज्याने केले आहे त्याला ते बरोबर लागते, असा टोलाच खडसेंनी प्रतिक्रिया देताना लगावला आहे.

नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ खडसे यांनी पुन्हा नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर खोचक टीका केली आहे. पालकमंत्री पदाची आवश्यकता नसेल सर्व ठिकाणचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतले पाहिजे. पालकमंत्री पदासाठी मी मागे सुद्धा म्हटलं होतं की का म्हणून लोचटपणा आणि लाचारी करावी. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी ऐकून सहा सहा महिने पालकमंत्री नियुक्त करू नये. त्या जिल्ह्यात चार चार मंत्री असताना बाहेरच्या जिल्ह्यातल्या मंत्राने मला पालकमंत्री करा असा आग्रह धरणं म्हणजे काहीतरी स्वार्थ आहे हजारो कोटी रुपयांचं बजेट कुंभमेळाचा आहे. कुंभमेळ्याच्या बजेट मधला काहीतरी मलिदा मला मिळावा, म्हणून पालकमंत्री करा असा काहींचा आग्रह आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ खडसे यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment