श्रीराम संस्थानतर्फे मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त‎ कीर्तनासह महाभिषेक‎

जळगाव‎ लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । श्रीराम‎ मंदिर संस्थानतर्फे श्री संत मुक्ताबाई ‎ ‎ ७२५ व्या पुण्यतिथीनिमित्ताने कीर्तन, ‎महाभिषेकासह विविध कार्यक्रम ‎घेण्यात आले. यात संत मुक्ताबाई ‎ ‎ पुण्यतिथीनिमित्ताने ‘तुम्ही संत‎ मायबाप कृपावंत’ या तुकाराम ‎ ‎महाराजांचे अभंगावर कीर्तन‎ घेण्यात आले.‎

श्रीराम मंदिरात संत मुक्ताईंच्या ‎पुण्यतिथीनिमित्ताने पहाटे ५ ते ७‎ वाजता आदिशक्ती श्री संत‎ मुक्ताबाई पादुकांवर महाअभिषेक ‎ ‎करण्यात आला. श्रीराम महाराज‎ यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले‎ तर पौरोहित्य नंदू शुक्ल गुरुजी यांनी‎ केले. तर सकाळी १० वाजता‎ प्रभाकर महाराज शिंपी वावडदेकर‎ यांचे कीर्तन झाले. ‘तुम्ही संत‎ मायबाप कृपावंत’ या अभंगावर‎ झालेल्या या कीर्तनाचा जळगावसह‎ शिरसोली, मोहाडी, हरिविठ्ठलनगर,‎ वाल्मीकीनगर, मेहरूण परिसरातील‎ भाविकांनी लाभ घेतला.

सायंकाळी‎ श्रीराम मंदिरात हरिपाठ श्री संत‎ मुक्ताईकृत ताटीचे अभंग‎ रामनामावली, रामरक्षा स्तोत्र होऊन‎ धुपारती झाली. या निमित्ताने श्री‎ ‎मुक्ताई मंदिरात राजू भावसार यांनी‎ रांगोळी काढली होती. मंगेश‎ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली‎ श्रीधर जोशी, बापू सोनार, निंबा‎ पाटील, अशोक शिंपी, सदाशिव‎ तांबट, जानकीराम भोई, देवेंद्र मोरदे,‎ जगदीश भावसार, कारभारी‎ गव्हाणे, दिलीप कोळी, दत्तात्रय‎ तेली, भगवान सुतार, प्रकाश‎ गोसावी आदींनी कार्यक्रमासाठी‎ सहकार्य केले. या कार्यक्रमामुळे‎ परिसरात धार्मिक वातावरण निर्माण‎ झाले हाेते.‎