Lumpy Skin : बंदी असतानाही सावद्यात भरला गुरांचा बाजार, प्रशासनाने घेतली दखल!

ऑगस्ट 7, 2022 4:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । जिल्ह्यासह ग्रामीण भागात गुरांवर जीवघेणा लंपी हा आजार आला आहे. त्यामुळे तो जास्त प्रमाणात पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सावदा येथे रविवारी भणारा गुरांचा बाजार देखील बंद ठेवावा असे आदेश देण्यात आले होते. त्या नुसार दि. ७रोजी भरणार गुरांचा बाजार बंद होता. मात्र, परराज्यातून येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांना याची माहिती नसल्याने त्यांनी रविवारी मोठ्या प्रमाणात गुरे विक्रीस आणली. दरम्यान, येथील प्रशासनांनी दखल घेतली.

savada 3

सावदा येथे रविवारी भरणारा गुरांचा बाजार जिल्हा प्रशासनाचा आदेशाने बंद ठेवण्यात आला होता. मात्र, परराज्यातून येथे मोठ्या प्रमाणात येणारे म्हशीचे व्यापारी यांना बाजार बंद रहाणार असल्याची माहिती नसल्याने त्यांनी गुरे विक्रीस आणली. परंतु, त्यांना जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार विक्री बंद असल्याने बाजार समितीत प्रवेश देण्यात आला नाही. मात्र, काही व्यापाऱ्यांनी बाजार समिती समोर असलेल्या खुल्या जागेतच गुरांचे विक्री व्यवहार सुरू केले. याची माहिती मिळताच जागृत पत्रकारांनी ही महिती प्रशासनास कळविली. त्यांनी लागलीच देखल घेऊन याबाबत जाणीव करून दिली. तसेच जनावरे लागलीच परत नेण्याच्या सूचना केल्या.

यावेळी बाजार समिती सचिव नितीन महाजन, सावदा मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सचिन चोळके, विनय खक्के यांच्यासह पोलिस उपस्थित होते. दरम्यान, बाजार समिती सचिव नितीन महाजन यांनी बाजार समितीत गुरे आहेत त्यांना लगेच लंपी ची लस देण्यात आली आहे, पुढील आदेश आल्या नंतर व्यवहार सुरू होतील असे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now