⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | बातम्या | डिसेंबर महिन्यातही LPG सिलेंडर महागला; वाचा किती रुपयांनी झाली वाढ

डिसेंबर महिन्यातही LPG सिलेंडर महागला; वाचा किती रुपयांनी झाली वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२४ । डिसेंबर महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा कल कायम राहिलाय. तेल विपणन कंपन्यांनी आज 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 16.50 रुपयांनी वाढ केलीय. दुसरीकडे घरगुती गॅस सिलींडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाहीय. आता एक डिंसेबरपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील जाणून घेऊया

दरम्यान, मार्च २०२४ पासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत अखेरीस १०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. पण मागील पाच महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत आज 1 डिसेंबरपासून 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1818.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात 16.50 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत आजपासून गॅस सिलिंडर १७७१ रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात त्याची किंमत १९८०.५० रुपये झाली आहे.

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. मुंबईमध्ये १९ किलो वजनाचा व्यवसायिक गॅस सिलेंडर १७५४ रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता १७७१ रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीमध्ये १८१८.५०, कोलकात्यामध्ये १९८०.५० रुपयांना सिलिंडर मिळेल. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ नाही –
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्च २०२५ मध्ये घरगुती गॅसच्या किंमतीत बदल झाला होता, त्यावेळी गॅसच्या किंमती १०० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. दिल्लीमध्ये ८०३, कोलकात्यात ८२९, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळतोय.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.