जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून खराब पाणी येत आहे. पाण्यामध्ये कित्येकदा गाळ पहायला मिळतो. याविरोधात जुना जळगाव परिसरातील नागरिकांनी. महापालिकेवर मोर्चा काढला.
जळगाव शहर महानगरपालिकेचे विशेष महासभा सुरू असतानाच जुने जळगाव परिसरातील नागरिकांनी महासभेवर मोर्चा काढला. गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरामध्ये खराब पाणी पुरवठा होत आहे. कित्येकदा खूप गाळ असणारे पाणी या नागरिकांच्या नळांमधून येत आहे या विरोधात आक्रोश करण्यासाठी नागरिकांनी हा मोर्चा काढला.
यावेळी नागरिकांनी मागणी केली की महानगरपालिकेने घरपट्टी वाढवली आहे मात्र जळगाव शहराचा विकास होत नाहीये. वर्षानुवर्ष जळगाव शहराचा विकास होत नसून आता मूलभूत सुविधा देखील नागरिकांना मिळत नाही आहे. याशिवाय नागरिकांचे म्हणणे होते की, साधी गटार सफाई देखील या महानगरपालिकेला करता येत नाही. यासाठी महानगरपालिकेने या बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
महासभा सुरू असल्याने त्या ठिकाणी महापौर व आयुक्त निवेदन स्वीकारण्यासाठी जाऊ शकले नाहीत मात्र नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन संकट, गिरिष खडके, विश्वनाथ खडके यांनी जाऊंन त्या नागरिकांची भेट घेलली.
पहा व्हिडिओ :